स्वतःला ठामपणे प्रस्थापित करत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कथा
प्रणव खूप छान आजचे संदर्भ, आजचे विषय घेत कथा रंगवतो. लेखन आजच्या काळातलं असलं तरीही त्यात अति इंग्रजीचा वापर नाही. आजीच्या गोष्टी जशा एकातून दुसरी हलकेच फुलत येते, तशाच आहेत प्रणवच्या गोष्टी. त्यामुळेच मला या गोष्टी फक्त एका वर्गासाठीच्या, एखाद्या काळासाठीच्या वाटल्या नाहीत. त्या स्वतःला ठामपणे प्रस्थापित करत स्वतःची ओळख निर्माण करतात.......